
‘नियम व अटी लागू’ या नाटकातल्या या गाण्यात संकर्षण बरोबर अमृता देशमुख देखील दिसत आहे. नवरा बायकोच्या नात्यावर असलेल्या या गाण्यावर नेटकऱ्यांनी पसंती दिली. गाण्याचा व्हिडीओ शेअर करत संकर्षण म्हणाला की, नाटकासाठी हे गाणं खास अशोक पत्की सरांनी लिहिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये असंही सांगितलं की, आमच्या “नियम व अटी लागू” नाटकामधलं हे गाणं हे गाणं कुणी लिहिलंय माहितीये ? जेष्ठं संगीतकार “अशोक पत्की सरांनी”
मला गाणं लिहायला सुचत नव्हतं, जे लिहिलं ते कुणाला आवडत नव्हतं.पत्की सरांनी नाटकाचं संगीत करता करता गाणं पण लिहिलं. अगदी तालमित बसल्या बसल्या. शब्दं कित्ती सुंदर आहेत बघाना
“नात्यांमधले रूसवे फुगवे ऊगाच भांडण का रे …?
एकमेकांस समजून घेऊ अरेथ नवे जगण्याचे…. माझ्या मना …
विसरून जाऊ सर्व त्या वेदना …. विसरून जाऊ सर्व त्या वेदना …!!! “
प्रत्येक प्रयोगांत हे लाईव्ह गातांना मज्जा येते… प्रेक्षकही सुंदर दाद देतात…
ऐकून सांगा कसं वाटतंय … आमचं नाटक पहायला पण नक्की या …!!!
संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. नियंम “नियम व अटी लागू” या नाटकाचं लेखन स्वत: संकर्षणने केलं तर दिग्दर्शन चंद्रकात कुलकर्णी यांचं आहे. या नाटकात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे मुख्य भुमिका साकारत असून हे नाटकं विनोदी पद्धतीने नवरा बायकोच्या नात्याची गोष्ट सांगतं.