Refusing the minister for dinner cost actress Vidya Balan dearly; Shooting of 'Lioness' movie stopped
(Vidya Balan) अभिनेत्री विद्या बालन ही दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकताच विद्या बालनचा (Vidya Balan) चित्रपट दो और दो प्यार आता प्रदर्शित झाला असून दर्शकांच्या पंसतीस उतरला आहे. काही दिवसापुर्वी बॅालिवूडमधील नेपोटिज्मवर वक्तव केल्यानं विद्या चर्चेत आली होती. आता पुन्हा विद्या चर्चेत आली आहे. एका मुलाखती दरम्नान विदयानं सांगितलं की, ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये भूमिकेसाठी तिला धुम्रपान करण्यास सांगण्यात आलं. पण भूमिका करताता तिला धुम्रपानाचं एक व्यसनच जडलं होतं.
[read_also content=”अभिनेता गुरचरण सिंगच अपहरण? पोलिसांना सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाची बाब आली समोर https://www.navarashtra.com/movies/police-found-cctv-footage-in-case-of-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-case-nrps-527731.html”]
या मुलाखीत दरम्याना विद्यानं खुलासा केला की, ‘द डर्टी पिक्चर’ शूटींग करताना तिला धम्रपान करताना दाखवायचं होतं. तेव्हा विद्या धुम्रपान करत नव्हती. सुरुवातीला ती ऑनस्क्रीन सिगारेट ओढायला तयार नव्हती, पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिगरेट ओढायला सुरुवात केल्यानंतर तिला सिगारेटचं व्यसन जडलं, असं तिनें सांगितलं.
विद्या म्हणाली, “या चित्रपटाआधी मी धूम्रपान केलं होतं, मला ते कसं करायचं हे माहित होतं, पण मी धूम्रपान करायचे नाही. पण एखादी भूमिका करताना तुम्ही धूम्रपान करण्याची नक्कल करू शकत नाही. आपल्याकडे धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशिष्ट समज आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर तो संकोच दिसायला नको होता. त्यामुळे मी धूम्रपान करण्याचा निर्णय घेतला. पण आता महिलांबद्दलचा हा समज खूप कमी झालाय, पण आधी तो खूप होता. ‘द डर्टी पिक्चर’ नंतर सिगारेटचं व्यसन जडलं आणि मी रोज दोन ते तीन सिगारेट ओढत असे,” असंही विद्याने नमूद केलं
विद्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘दो और दो प्यार’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि विद्या बालन पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि सेनडिल रामामूर्तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर आगामी काळात ती पुन्हा मंजुलिकाच्या रुपात भूलभुलैया 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.