फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता विजय सेतूपती दक्षिणात्य सिनेमांमध्ये त्याच्या विशेष अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे सिनेमे फक्त दक्षिण भारतात नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने पाहिले जातात. संपूर्ण भारतभरात विजय सेतुपतीची चाहते मंडळी दिसून येते. मुळात, सेतुपतीवर काही गंभीर आरोप लावले आहेत. रम्या मोहन म्हणून एका अधिकृत युजर आयडीवरून सेतुपतीवर आरोपांचा पाढा वाचण्यात आला आहे. या आरोपांमध्ये ड्रग्स, लैंगिक शोषण असे गंभीर आरोप लावण्यात आले आहे, त्यामुळे सिनेसृष्टीत सर्वत्र चर्चा रंगली आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की या गंभीर आरोपांवर सेतुपतीने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही आहे आणि रम्या मोहनने केलेली X पोस्ट, तिने स्वतःहून डिलीट केले आहे.
नेमकं असं काय लिहलं गेलंय त्या X पोस्टमध्ये?
रम्या मोहन यांनी त्या X पोस्टमध्ये लिहले आहे की, “कॉलीवुडमधील ड्रग्ज आणि कास्टिंग काउचची समस्या अतिशय गंभीर आणि व्यापक आहे. माझ्या ओळखीची एक मुलगी जी आता मीडियामध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. तिला अशा दुनियेत ढकललं गेलं, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. सध्या ती रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज, फसवणूक आणि “इंडस्ट्री नॉर्म” या नावाखाली होणारं शोषण फारच सामान्य झालं आहे. विजय सेतुपती यांनी एका “कारवॅन फेवर”साठी २ लाख रुपये आणि “ड्राईव्हसाठी” ५० हजार रुपये ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण हेच लोक सोशल मीडियावर स्वतःला फार मोठं संत म्हणून दाखवतात. त्या मुलीचं अनेक वर्षं शोषण झालं. ही फक्त एका मुलीची गोष्ट नाही, तर अशा कितीतरी मुलींची कटू सत्यं आहेत. माध्यमं मात्र अशा लोकांना देवपण बहाल करतात. हे काही विनोद करण्यासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे.”
या प्रकरणावरून विजय सेतुपतीचे चाहते मंडळी सेतुपतीचे वक्तव्य ऐकण्यास आतुर आहेत. सेतुपती २०२६ मध्ये पेड्डी या सिनेमात दिसून येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काय परिणाम होईल? याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागून आहे.