या आठवड्यात प्रेक्षकांना विक्रम, सम्राट पृथ्वीराज आणि मेजर हे तीन मोठे चित्रपट पाहायला मिळाले. तीनही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमल हसन (Kamal Haasan) यांची मुख्य भूमिका असलेल्या विक्रम (Vikram) या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सम्राट आणि मेजरच्या तुलनेत जबरदस्त कमाई केली आहे. प्रदर्शाच्या दुसऱ्या दिवशी या विक्रम चित्रपटानं वर्ल्डवाइड १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
कमल हासन अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांचं काम पडद्यावर बोलतं. विक्रम चित्रपटातील त्यांच्या अभिनयानेही लोकांना वेड लावले आहे. पहिल्या दिवशी जगभरात 58 कोटींची कमाई केल्यानंतर विक्रमने दुसऱ्या दिवशीही बऱ्यापैकी कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या ट्विटनुसार, कमल हसन स्टारर सिनेमाने दुसऱ्या दिवशी वर्ल्डवाइड १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
याचा अर्थ विक्रमने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी जगभरात 42 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या वीकेंडला 100 कोटींची कमाई करणाऱ्या विक्रमला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. यासह कमल हसनच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज आणि आदिवी शेषच्या मेजरला मागे टाकले आहे.
कमल हसन स्टारर विक्रम चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. लोकेश कनगराज हे त्याचे लेखकही आहेत. सुपरस्टार कमल हासनने या चित्रपटात एका निवृत्त रॉ एजंटची भूमिका साकारली होती. चित्रपटात कमल हसनशिवाय विजय सेतुपती आणि फहद फासिल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या वीकेंडला जेव्हा विक्रमने एवढं छान कलेक्शन केलं असेल तेव्हा विचार करा, मग भविष्यात काय होणार आहे.