प्रेक्षकांसह समिक्षकांच भरपुर प्रेम मिळालेल्या 12 वी फेल चित्रपट आणि अभिनेता विक्रांत मेसीचं कौतुक अजुनही सुरुचं आहे. अनेक सेलेब्रिटिंनी चित्रपट पाहिल्यानंतर विक्रांतवर कौतुकाचा वर्षाव केला. आता या चित्रपटानंतर विक्रांत मेसीचं नशीब चमकलं असून त्यांना राजकुमार हिरानीच्या वेब सिरीजमध्ये मुख्य भुमिका करण्याची संधी मिळाली आहे. रिपोर्टनुसार, विक्रांत या वेब सीरिजमध्ये सायबर क्राइम सिक्युरिटी एक्सपर्टची भूमिका साकारणार आहे.
[read_also content=”करिनानं 12 वी फेल’चं केलं कौतुक, ‘मग मी आता रिटायर होऊ शकतो’, विक्रांत मेस्सीनं दिला भन्नाट रिप्लाय! https://www.navarashtra.com/movies/vikrant-massey-says-now-he-can-retired-after-kareena-kapoor-praise-12-th-fail-nrps-503907.html”]
दिगदर्शक राजकुमार हिरानी आता ओटीटीवर पदार्पण करण्याचा विचार करत आहेत. ते एक वेब सीरिज बनवत आहे, ज्यामध्ये विक्रांत मेसीला मुख्य भूमिकेत साइन केले आहे. या वेब सीरिजमध्ये सायबर क्राइम सिक्युरिटी एक्सपर्टची भूमिका साकारणार आहे.या वेब सिरीजचे दिग्दर्शन आमिर सत्यवीर सिंग करणार आहे, जे राजकुमार हिराणीचा सहाय्यक आहे. ही मालिका सायबर क्राईमच्या वर आधारित असेल.
जेव्हा राजकुमार हिरानी यांना विचारण्यात आले की तो कधी OTT वर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे, तेव्हा ते म्हणाले की जेव्हा त्याच्याकडे सांगण्यासाठी चांगली कथा असेल तेव्हा तो नक्कीच करेल. त्याला व्यासपीठ काही फरक पडत नाही. जर ती टेलिव्हिजनसाठी असेल तर ती कथा टीव्हीवर सांगावी आणि जर ती दीर्घ स्वरूपाची असेल तर ती ओटीटीवर सांगावी.
विक्रांत मॅसीबद्दल सांगायचे तर, मिर्झापूर, ब्रोकन बट ब्यूटीफुल आणि क्रिमिनल जस्टिसनंतरची ही त्याची चौथी वेब सिरीज असणार आहे.