गेल्या अनेक दिवसापासून विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित १२ वी फेल हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात १२ वी फेल नं उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आपल्या नावे केला. तर विक्रांत मेसीलाही उत्कृष्ट अभिनेता (समिक्षक) चा पुरस्कार मिळाला. अजूनही या चित्रपटाचं कौतुक करणं थांबलेलं नाही आहे. आलिया भट्ट, वरुण धवन,ऋतिक रोशनआणि दीपिका पदुकोणसह या सेलिब्रिटींनंतर आता करीना कपूर खानही ’12वी फेल’ या चित्रपटाचं कौतुक(Kareena Kapoor Praise Vikrant Massey) केलं आहे. करिनाने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे तर, यावर अभिनेता विक्रातंनही भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे, जी चांगलीच चर्चेत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने 12वी फेलचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. करिनानं चित्रपटाचं कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टला दिग्गज म्हटले आहे.
करिनानं 12 वी फेलचं कौतुक केल्यानंतर अभिनेता विक्रांत मेसीचा आनंद गगनात मावेना झालाय. त्याने करिनाची इन्स्टा स्टोरी शेअर करत आभार व्यक्त केलं आहे. विक्रांत म्हणाला की, विक्रांत मॅसीने एक अतिशय गोड रिप्लाय करत म्हटले आहे “आता मी निवृत्त होऊ शकते. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्हाला कल्पना नाही की माझ्यासाठी याचा किती अर्थ आहे.”
समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेसीनं (Vikrant Massey) प्रमुख भूमिका साकारली आहे तर मेधा शंकर,अनंत जोशी, अशुंमन पुष्कर यांच्याही महत्त्वाच्या भुमीका आहेत. . आयपीएस ऑफिसर मनोज कुमार शर्माच्या बायोपिक आधारित या चित्रपट विक्रांत मेसीच्या फिल्मी करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी ’12th फेल’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ’12th फेल’ हा भावनिक सिनेमा आहे ज्यामध्ये गरीब कुंटुंबात जन्मलेल्या मुलाची नोकरी आयपीएस ऑफिसर बनण्याचा प्रवास दाखवला आहे.