Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: जिल्ह्यात ‘विश्वास करंडक’ला सुरुवात! 30 बालनाट्यांचे होणार सादरीकरण

संपूर्ण विदर्भातील प्रतिष्ठित ‘विश्वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा ११ ते १३ डिसेंबर दरम्यान अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडणार असून ३० शाळांची ३० नाटके सादर होणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 10, 2025 | 08:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ३० शाळांमधील ३० बालनाट्यांचे सादरीकरण होणार
  • स्पर्धेतील प्रयोग दररोज सकाळी ९ वाजता सुरू होणार
  • रोज सरासरी ८ ते १० नाटकांचे सादरीकरण केले जाईल
संपूर्ण विदर्भातील प्रतिष्ठित ‘विश्वास करंडक’ बालनाट्य स्पर्धा यंदा गुरुवार (दि. ११) पासून सुरू होत असून, अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात या तीन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (११) ते शनिवार (१३) या कालावधीत चालणाऱ्या स्पर्धेत अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या वन्हाड प्रांतातील ३० शाळांमधील ३० बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे.

या ३० नाट्यांपैकी जे. आर. डी. टाटा स्कूलची ४ नाटके विशेष निमंत्रित स्वरूपात सादर होणार असून ती स्पर्धात्मक गटात समाविष्ट नसतील, अशी माहिती महोत्सव प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे आणि प्रसिद्धीप्रमुख प्रदीप खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

P&G शिक्षा’ अंतर्गत वंचित विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी स्वयंसेवक मोहीम! करिअर मार्गदर्शनाचे धडे

दररोज सकाळी ९ वाजता नाट्यप्रयोग

स्पर्धेतील प्रयोग दररोज सकाळी ९ वाजता सुरू होणार असून, रोज सरासरी ८ ते १० नाटकांचे सादरीकरण केले जाईल. स्पर्धेचे परीक्षण नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञ गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे आणि यतीन माझीरे करणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटनप्रयोग गेल्या वर्षी विश्वास करंडक जिंकणाऱ्या प्रभात किड्स स्कूलच्या नाटकाने होणार आहे. उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रथम १५,००० रुपये आणि द्वितीय ११,००० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार (दि. १३) सायंकाळी पार पडणार असून, तो अकोल्याचे मूळचे रहिवासी, आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे परीक्षक आणि चित्रपट संकलक विनय वैराळे यांच्या हस्ते होईल. यापूर्वी शहरातून विश्वास करंडकाची भव्य फेरी काढण्यात येईल. या फेरीत मागील वर्षातील स्त्री-पुरुष विजेते सहभागी होतील. मागील वर्षी गटात उत्कृष्ट कलावंत म्हणून प्रथम पुरस्कार मिळवलेल्या रुद्र कुकडकर (इंड्यूवीला पब्लिक स्कूल, पातुर) आणि अनया कुन्हे (आरडीजी पब्लिक स्कूल, अकोला) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल.

शहाजी नगर मनपा शाळेची राज्यभरात धमक; दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

आयोजनात विविध समित्यांचा सहभाग

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मधु जाधव, प्रशांत गावंडे, प्रदीप खाडे यांच्यासह प्रदीप अवचार, अशोक ढेरे, नीलेश गाडगे, अनिल कुलकर्णी, विष्णू निंबाळकर, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, गीताबाली उनवणे, रितेश महल्ले, संदीप शेवलकर, अंकुश इंगळे आदी कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. आयोजकांनी समस्त रसिक नागरिकांना या तीन दिवसीय बालनाट्य महोत्सवाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Vishwas karandak in akol will started on 11 december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • Entertainement News

संबंधित बातम्या

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
1

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
2

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
3

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
4

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.