फोटो सौजन्य - Social Media
विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापूर्वी तालुका आणि विभाग स्तरावरही समान वर्चस्व राखत दोन्ही पातळ्यांवर प्रथम क्रमांक पटकावला होता. सातत्यपूर्ण कामगिरी आणि खेळातील निष्ठेमुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.
या उज्ज्वल यशामागे शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण धनुष्यबाण यांचे विशेष सहकार्य असून शारीरिक शिक्षण शिक्षक सुरेश दडस यांनी या दोन मुलांना किक बॉक्सिंगचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक तयारी करून दिली. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या आणि अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर राज्यात सुवर्णपदक मिळवून दाखवले.शहाजी नगर मनपा हिंदी शाळा, चित्ता कॅम्प या विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने शाळेमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी यापूर्वीही विविध क्रीडा उपक्रमांमध्ये चमक दाखवत आहेत. मात्र या दोघांची धमाकेदार कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करते की योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थी-केंद्रित सुविधा मिळाल्यास महानगरपालिकेच्या शाळांमध्येही प्रचंड क्रीडा प्रतिभा दडलेली आहे.
या दोन्ही युवा क्रीडापटूंच्या निवडीबद्दल पालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी किरत कुडवे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख दत्तू लवटे, प्रशासकीय अधिकारी विद्या मॅडम आणि कनिष्ठ पर्यवेक्षक किरण इंगळे यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या प्रकारे दोन्ही विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे, त्यावरून या दोघांकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. किक बॉक्सिंगसारख्या आव्हानात्मक खेळात सुवर्णपदकाची चमक दाखवलेल्या विवेक साकेत आणि संदीप पासवान या दोन्ही मुलांचे हे यश भविष्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.






