
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती म्हणजेच पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते. सानियाच्या एका पोस्टमुळे तसेच काही जवळच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार सानिया आणि शोएब यांच्यात घटस्फोट झाल्याचे देखील बोलले जात होते. मात्र आता त्यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. दोघेही लवकरच एका टॉक शो द्वारे एकत्र दिसणार आहेत. या शोचे नाव ‘मिर्झा मलिक शो’ असे आहे.
मागील काही दिवसांपासून सानिया आणि शोएब यांच्यातील घटस्पोटाच्या बातम्यांनी जोर धरला होता. एका शो दरम्यान शोएबने सानियाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हापासून संबंध बिघडले होते. मात्र, याप्रकरणी सानिया आणि शोएबकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पण यादरम्यान नवीन शोची घोषणा नक्कीच झाली आहे.
शोएब मलिकचे नाव मॉडेल आयशा उमरसोबत जोडले जात आहे. शोएब आणि आयशा एकमेकांना डेट करत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. त्यामुळे सानिया आणि शोएबमध्ये अधिकृतपणे घटस्फोटही झाला असल्याचे सांगितले जात होते. पण आता नव्या शोची घोषणा झाल्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या घटस्पोटाबाबत सस्पेन्स वाढला आहे. या दोघांमध्ये खरंच घटस्फोट झाला आहे का? की दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले आहे? या प्रश्नांची उत्तरे कदाचित टॉक शो आल्यावरच चाहत्यांना मिळू शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.