सध्या सगळीकडे अॅनिमल चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे. अभिनेता रणबीर कपूरचा अभिनाचं कौतुक होत असताना अभिनेता बॅाबी देओलनही त्याच्य अभिनयानं प्रेक्षकाचं मन जिकलं आहे. बॅाबीची ही दुसरी सिनेमॅटिक इनिंग पहिल्या प्रमाणेच उत्कृष्ट ठरत आहे. बॉबी देओलने गेल्या काही वर्षांत क्लास ऑफ 83, लव्ह हॉस्टेल आणि आश्रममधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या अॅनिमलमुळे बॉबी देओल चांगलीच प्रशंसा मिळवत आहे. अॅनिमल ‘मधली बॉबीची भूमिका छोटी असली तरी त्याला भरभरून दाद मिळत आहे. आता अॅनिमलनंतर प्रेक्षक बॉबी देओलच्या आगामी सिनेमांची (Bobby Deol Upcoming Movies) वाट पाहत आहेत. जाणून घ्या त्याच्या आगामी सिनेमाबद्दल…
[read_also content=”सोशल मीडियावर अॅनिमलबद्दल मिक्स रिव्हू, तरीही बॅाक्स ऑफिस कलेक्शन जोरात; सातव्या दिवशीही दणदणीत कमाई! https://www.navarashtra.com/movies/animal-box-office-collection-day-7-nrps-487213.html”]
अपने 2: देओल कुटुंबाचा ‘आपने’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉबी देओल, सनी देओल आणि धर्मेंद्र यांची मुख्य भुमिका होती. या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून चाहते आता त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी बॉबी देओलने वृत्तसंस्था ANI सोबत बोलताना अपने 2 च्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे सांगितले होते.
श्लोक- द देसी शेरलॉक:
बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘श्लोक- द देसी शेरलॉक’चाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले असून या चित्रपटात बॉबीसोबत अनन्या बिर्ला दिसणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये, बॉबी देओलने सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंग पोस्टचा एक फोटो शेअर केला होता. या शॉटमध्ये बॉबी देओल समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका यॉटमध्ये कुणालसोबत होता.
हाऊसफुल 5 : हाऊसफुल सीरीजचे आतापर्यंत 4 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांना पसंती मिळाली आहे. काही दिवसापुर्वी चित्रपटाच्या पाचव्या भागाची म्हणजेच हाऊसफुल 5 ची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या अधिकृत स्टारकास्टची घोषणा करण्यात आलेली नाही पण वृत्तानुसार बॉबी देखील या चित्रपटात दिसणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत.