कोण आहे 'तारक मेहता...' मालिकेतली नवी दयाबेन? टीव्ही अभिनेत्रीचा सेटवरील फोटो व्हायरल
सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे. या मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलंसं करत त्यांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कलाकार कायमच चर्चेत राहिले आहेत. मालिकेमुळे त्यातील कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेमध्ये दयाबेनचं पात्र साकारणारी दयाबेन गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेमध्ये दिसलेलीच नाहीये. २०१८ मध्ये मॅटर्निटी लिव्हसाठी गेलेली दिशा वाकानी काही दिवस मालिकेमध्ये दिसणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक होतं. पण ८ वर्षे झाले तरीही अजून दिशा मालिकेत परत आलेली नाही.
‘असा कसा मला तुझा छंद लागला…’ बबिताचे Cute अंदाजातले फोटो Viral
गेल्या काही महिन्यांपूर्वी मालिकेत दयाबेन येणार, अशी चर्चा सुरु होती. पण तसं मालिकेच्या ट्रॅकमध्ये काहीही दिसलं नाही. आता मालिकेमध्ये पुन्हा एकदा दयाबेन येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते आता नव्या दयाबेनच्या शोधात आहेत. दरम्यान, दयाबेनच्या लूकमधील अभिनेत्री काजल पिसाळचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी ‘दयाबेन’ च्या भूमिकेसाठी काजल पिसाळला घेण्याचा निर्णय केला आहे. ऑडिशनसाठी अभिनेत्रीने कठोर परिश्रम घेतले होते.
‘गुलकंद’ चित्रपटाच्या कलाकारांची गिरगावाच्या शोभायात्रेत हजेरी; पाहा Photos
यापूर्वी, ETimesला दिलेल्या मुलाखतीत, काजलने सांगितले होते की ती TMKOC निर्मात्यांकडून फोन येण्याची वाट पाहत होती, परंतु तिला कधीही फोन आला नाही. यामुळे तिला जाणवले की ‘दयाबेन’ ची भूमिका काजलसाठी नाही. तर २०२२ मध्ये एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यांनी सांगितले होते की, मला माहित नाही की या अफवा कोण पसरवत आहे. काजल पिसाळ कोण आहे हे मला माहितही नाही. मी तिला कधी भेटलोही नाही. याआधी अनेक अभिनेत्रींची नावे घेण्यात आली होती, ज्यांच्याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. दिशा वाकानी आता शोमध्ये परतणार नाही याचीही निर्मात्यांनी पुष्टी केली. होती.
Swapnil Joshi: यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी ठरला खास, नववर्षाची केली हटके सुरुवात
काजल पिसाळच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काजल पिसाळ ही राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्या ‘बडे अच्छे लगते हैं’ चित्रपटात ‘इशिका कपूर’ च्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. याशिवाय, काजलने ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘साथ निभाना साथिया’ या सारख्या अनेक शोमध्ये तिने काम केले आहे. सध्या काजल ‘झनक’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काजलबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘सिर्फ तुम’मध्ये एका लहान मुलाच्या आईची भूमिका साकारताना दिसली होती, तिला तिच्या भूमिकेमुळे खूप ट्रोलही करण्यात आले होते.