दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे यांच्या 'गुलकंद' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. १ मे २०२५ ला रिलीज होणाऱ्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. 'गुलकंद' चित्रपटाच्या कलाकारांनी 'गुढीपाडवा'निमित्त प्रमोशनला उपस्थिती लावली आहे. 'गुलकंद' चित्रपटाच्या निर्मात्यांसह दिग्दर्शकांनीही आणि कलाकारांनीही प्रमोशनला हजेरी लावली आहे.
Girgaon Shobha Yatra For Promotion Gulkand Movie
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा ‘गुलकंद’हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक – ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
कलाकारांनी 'गुढीपाडवा'च्या निमित्त प्रमोशनला हजेरी लावली होती. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वच कलाकारांनी आपल्या चाहत्यांसोबती सेल्फी काढल्या. चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता असून कलाकारांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गिरगावच्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने तरुणांनी हजेरी लावली होती. मुंबईसह मुंबईच्या उपनगरांतून या शोभायात्रेला चाहत्यांनी हजेरी लावली होती.
सोशल मीडियासह सर्वत्र ‘गुलकंद’चित्रपटानिमित्त चाहत्यांकडून कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.