Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निर्मिती संवाद’ कार्यशाळेचे आयोजन, अभिनेते सचिन पिळगावकरांनी राज्यातील चित्रपट निर्मात्यांना मोलाचा सल्ला

मेघराज राजेभोसले फाऊंडेशन' आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठीच्या 'निर्मिती संवाद' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 18, 2024 | 09:46 PM
'निर्मिती संवाद' कार्यशाळेचे आयोजन, अभिनेते सचिन पिळगावकरांनी राज्यातील चित्रपट निर्मात्यांना मोलाचा सल्ला

'निर्मिती संवाद' कार्यशाळेचे आयोजन, अभिनेते सचिन पिळगावकरांनी राज्यातील चित्रपट निर्मात्यांना मोलाचा सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

‘कथा हा चित्रपटाचा आधारस्तंभ असतो. तो भक्कम हवा. फक्त पैसे आहेत, म्हणून निर्माते होऊ नका. चित्रपट माध्यमाचा आणि व्यवसायाचा अभ्यास करा.” असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांनी राज्यभरातील चित्रपट निर्मात्यांना दिला. ‘मेघराज राजेभोसले फाऊंडेशन’ आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठीच्या ‘निर्मिती संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या संकुलात नुकतेच पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ४०० हून अधिक चित्रपट निर्मात्यांचा यात सहभाग होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक, वितरक, थिएटर मालक, वाहिन्यांचे कार्यकारी अधिकारी, ओटीटी तज्ञ अशा अनेक विषयतज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

हे देखील वाचा- प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा आवाजच गेला, पोस्ट शेअर करत केला स्वत:च खुलासा

सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, ‘सिनेमा फ्लाॅप होत नाही, तुमचे बजेट फ्लाॅप झालेले असते. बजेटवर नियंत्रण ठेवायला शिकून घ्या. शासनानेही निर्मात्यांना आर्थिक साह्य देण्याबरोबर इतरही बाबींसाठी मदत करावी.’ तेजस्विनी पंडित म्हणाल्या, ‘निर्मात्यांनी समूहनिर्मितीचा प्रयोग करावा ग्लॅमर नाही, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मराठी चित्रपट पुढारलेले नाहीत आणि लार्जर देन लाईफ असे मराठीत काही नसते, या सर्व आक्षेपांना उत्तरं देणे शक्य होईल.’

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनीही या कार्यशाळेत विचार मांडले. कथेच्या निवडीपासून ते चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांसह शासकीय अनुदान, टिव्ही चॅनल्स, ओटीटी आणि विविध हक्क विक्रीसंबंधी वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा झाल्या.

हे देखील वाचा- “कॉलर पकडली आणि धमकी दिली…”; दिलीप जोशी यांचं ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांशी झालं कडाक्याचं भांडण

राज काझी यांनी विषयवार आरेखन केलेल्या या कार्यशाळेत सुनील सुकथनकर, किरण यज्ञोपवित, कांचन अधिकारी, शशांक शेंडे, संजय ठुबे, नीलेश नवलाखा, उपेंद्र सिधये, सुरेश देशमाने, राहुल रानडे, संजय दावरा, युगंधर देशपांडे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर, गणेश गारगोटे, फिल्मसिटीचे पंकज चव्हाण, हेमंत गुजराती, संतोष रासकर, किरण रोंगे, गिरीश जांभळीकर, अन्वय कोल्हटकर, शौकत पठाण, शाम मळेकर, सुरेश तळेकर, आदित्य देशमुख, योजना भवाळकर-भावे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सूर्यदत्त प्रॉडक्शन हाऊस आणि उर्विता प्रॉडक्शन्स यांचे सहकार्य या उपक्रमास लाभले होते.

चित्रपट निर्मितीला सहकार्याची शासनाची भूमिका
या कार्यशाळेत उपस्थित गोरेगाव फिल्मसिटीचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण यांनी शासनाचे चित्रपटविषयक धोरण स्पष्ट केले. शासनाच्या अनुदान योजनेतील विविध सुधारणा आणि याशिवायच्या विविध साह्यकारी योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. एक खिडकी योजना सुरू असून, निर्मात्यांनी त्याचा लाभ घ्यावा, कलासेतू पोर्टलला भेट द्यावी, असेही ते म्हणाले.

Web Title: Workshop titled nirmit samvad for marathi filmmakers was organized by meghraj rajebhosale foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 09:46 PM

Topics:  

  • marathi actor
  • Marathi Film Industry
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.