सायबर सेलनंतर आता रणवीर- अपूर्वा महिला आयोगासमोर हजर, सुनावणीमध्ये आयोग काय म्हणाले ?
Supreme Court: लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखीजा, समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘इंडिया गॉट लेटेंट’मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त टिप्पण्यांबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘इंडियाज गॉट लेटेंट’शोमध्ये सहभागी झालेल्या युट्यूबर्सना चौकशीला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. आता त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. शोमधील सर्वच युट्यूबर्सने चौकशीसाठी हजेरी लावली होती.
आलिया भट्ट करतेय दुर्धर आजाराशी सामना; खुलासा करत म्हणाली, ‘स्ट्रगल करावा लागतोय…’
महिला आयोगाने फेब्रुवारी महिन्यात रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा, जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी, तुषार पुजारी, सौरभ बोथरा आणि बलराज घई यांना समन्स बजावले होते. तथापि, त्या सर्वांनी वेगवेगळी कारणे सांगून हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. रणवीरने महिला आयोगाकडे तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे तो उपस्थित राहू शकणार नाही असे त्याने सांगितले. हे मान्य करून आयोगाने ६ मार्च ही तारीख निश्चित केली होती. दरम्यान, अपूर्वा मुखिजाने सुरक्षेच्या कारणास्तव व्हर्च्युअल पद्धतीने हजर राहण्याचे आवाहन केले होते, जे महिला आयोगाने फेटाळून लावले.
Sikandar चित्रपटाने रिलीजआधीच केली करोडोंची कमाई, केलं बजेटपण वसूल…
इंडियाज गॉट लेटेंटमधील वादानंतर, मुंबई आणि आसाम पोलिसांची टीम चौकशीसाठी रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी त्याचे घर बंद होते. नंतर रणवीर आणि आशिष चंचलानी पोलिसांसमोर हजर झाले. दरम्यान, वाद सुरू झाल्यापासून रैना परदेशात आहे. त्याने पोलिसांना व्हर्च्युअल पद्धतीने हजर राहण्याचे आवाहनही केले होते, जे फेटाळण्यात आले होते. वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा शो प्रकाशित करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शोचे सेट डिझायनिंगवरही त्यांना बदल करण्याची सुचना केली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला आणि समयला दिलासा दिला कारण २८० लोकांच्या नोकरी गदा न यायला हवी, यासाठी हा शो सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. रणवीर अलाहबादिया प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल म्हणाले की, त्यांनी संपूर्ण शो पाहिला आहे पण त्यात अश्लीलता नाही पण त्यात विकृती आहे. ते म्हणाला की विनोद ही एक गोष्ट आहे आणि अश्लीलता ही दुसरी गोष्ट आहे. आणि विकृती वेगळ्याच पातळीवर आहे.