Alia Bhatt Net Worth
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आलिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिला अटेन्शन डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीडी) असल्याचे उघड केले आहे. यापूर्वीही एका मुलाखतीत या आजाराबद्दल तिने खुलासा केला होता.
अलिकडेच अभिनेत्रीने जय शेट्टीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आजारपणावर भाष्य केले आहे. मुलाखतीत, आलियाने तिच्या मेंटल हेल्थ जर्नीबद्दल सांगितले आणि ती कोणतेही औषध घेत नसल्याचेही उघड केले. तिने एडीएचडीच्या तिच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दलही सांगितले. शिवाय अभिनेत्रीने सांगितले की, ती अनेकदा सर्वसामान्य लोकांसमोर असामान्यपणे वागते. आलियाने सांगितले की, “अनेकदा माझ्यासोबत असे घडते, जेव्हा मी एखाद्या अ-यादीतील (A List) सेलिब्रिटीला मग तो हॉलिवूडचा असो किंवा अगदी बॉलिवूडमधील असो, माझ्याशी संबंधित असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलताना पाहते आणि मला वाटते की, ‘त्यांनाही ते जाणवत आहे. ते कायमच आपल्या सर्वांसोबत घडते. म्हणूनच मी माझ्या विशिष्ट चिंतेबद्दल बोलण्यास अधिक मोकळे झाली आहे. माझी अलीकडेच वैद्यकीय चाचणी झाली होती, म्हणून मला योग्य पाठिंबा मिळाला, फक्त ‘अरे, माझा दिवस चिंताग्रस्त आहे’ असे म्हणण्यासारखे नाही. ते फक्त तेवढेच नाही.”
गोविंदाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान गमावला जवळचा व्यक्ती, ओक्साबोक्षी रडूही आवरेना Video Viral
आलियाने तिच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, “मी संघर्ष करत होते, म्हणून मी मदत मागितली.” तिच्या समस्यांचा तिच्या सामाजिक जीवनावर कसा परिणाम झाला आहे हे तिने स्पष्ट करताना ती पुढे म्हणाली, “सर्वसामान्य लोकांमध्ये मी फिजिकली रिॲक्ट होते. मी आता मारहाण करायला सुरुवात करणार आहे. मला लक्ष केंद्रित करण्यासही त्रास होतो. माझे लक्ष विचलित होते.” आलियाने देखील शेअर केल्या होत्या की तिला एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याचा खूप अभिमान आहे, परंतु आता तिला दिसते की याचा तिच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो. ती म्हणाली, “मला जाणवलं की जरी मी अनेक कामे करू शकते तरी त्याचा माझ्यावर परिणाम होतो. हे का घडत आहे हे मला समजून घ्यायचे होते. मी अनेक सामान्य गोष्टी विसरू लागले, अगदी मी माझं नेहमीचं कॅलेंडरही विसरतेय.”
Sikandar चित्रपटाने रिलीजआधीच केली करोडोंची कमाई, केलं बजेटपण वसूल…
आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांमध्ये शिव रवैल दिग्दर्शित ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी निर्मित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटांचा समावेश आहे. चाहते अभिनेत्रीच्या या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलियाचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जिगरा’ होता जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.