11th international yoga day 2025 celebrated by political leader
विषाखापट्टनम येथे आयोजित करण्यात आलेल्या योग दिनाच्या खास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मोठ्या उत्साहाने ध्यानधारणा आणि योगाचे महत्त्व पटवून दिले.
'आंतरराष्ट्रीय योग दिना'निमित्त अहमदाबादमधील स्थानिक रहिवाशांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योगासने केली. तसेच यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे योगधारणा केली.
नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये योग दिन साजरा केला. जागतिक योगदिनानिमित्त आयोजित 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 11 व्या 'आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. गोरखपूर येथील श्री गोरखनाथ मंदिरात 'निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी योगधारणा केली.
मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिन साजरा केला आहे. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.
पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात अलौकिक भक्तीयोग कार्यक्रमामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले होते.