कॉमेडी चित्रपट बघायला कोणाला आवडत नाहीत. बॉलिवूडमध्ये गेल्या दशकांपासून कॉमेडी चित्रपट बनवले जात आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे आणि आजही हसवत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाविषयी सांगत आहोत, जो 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर त्याने दबदबा निर्माण केला. एवढेच नाही तर हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता, ज्याने 25 आठवडे मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवले आणि आज OTT वर देखील राज्य करत आहे.
17 वर्षांपूर्वीचा तो कॉमेडी चित्रपट जो पाहिल्यावर आजही हसू आवरत नाही, 32 कोटींचा बजेट अन् कमाई 117 कोटी

हा चित्रपट 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कामाई करणारा चित्रपट ठरला. आजची हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे

जर तुम्ही बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असावा. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत याचे नाव आहे, 'वेलकम'. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. चित्रपट अक्षय कुमार, कतरीना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर, मल्लिका शेरावत असे दिग्ग्ज कलाकार दिसन आले

विकिपीडियानुसार, या चित्रपटाचे बजेट 32 कोटी रुपये होते आणि त्याने 117.91 कोटी रुप्यांची कमाई केली. हा चित्रपट 21 डिसेंबर 2007 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि जवळपास 25 आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालला

या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.1 रेटिंग मिळाली. चित्रपटाची कथा आणि सर्व कलाकारांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि आजही ती जिंकत आहेत

हा चित्रपट त्या वर्षांतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. पहिल्या स्थानावर शाह रुख खानचा 'ओम शांती ओम' चित्रपट होता






