फोटो सौजन्य- gemini
आषाढी वारीनंतर भाविक कार्तिकी एकादशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिक महिन्याची सुरुवात झालेली आहे. कार्तिकी एकादशीदरम्यान मंदिर फुलांनी सजवले जाते. रोषणाई केली जाते. भजन, कीर्तन आणि दिंडीचे आयोजन केले जाते. असेच आयोजन यावेळी शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी दादर येथे फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे.
संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीनिमित्त दादर येथे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याचे सोळावे वर्ष असून, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
मुंबईत नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त व्यस्त असलेल्या आणि पंढरपूर येथे जाऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांना मुंबईतच भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या नामस्मरणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेल परिसरात होणारा रिंगण सोहळा हे या दिंडीचे विशेष आकर्षण असते. या रिंगण सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या भवितमय सोहळ्यात सर्व विठ्ठलभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्तिकी एकादशीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फुल मार्केट व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.
गेली १५ वर्षे ही परंपरा उत्साहात सुरू असून, यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दिंडीमध्ये पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, बॅंड-पथक, विठ्ठल नामाचा जयघोष आणि जागोजागी काढण्यात येणाऱ्या आकर्षक रांगोळ्या हे विशेष आकर्षण असणार आहे.
दादर फुल मार्केट येथून सुरू होणारी ही दिंडी सेनापती बापट मार्ग, दादर फुल मार्केट परिसर, रेल्वे स्थानक परिसर, कबुतरखाना, एन.सी. केळकर रोड, रानडे रोड मार्गे डी. एल. वैद्य रोडवरील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पोहोचणार असून, तेथे दिंडी सोहळ्याची सांगता होईल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: २१ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवारी दादरमध्ये भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Ans: दिंडी फुल मार्केट, दादर स्टेशन परिसर, कबुतरखाना, एन. सी. केळकर रोड आणि रानडे रोडमार्गे डी. एल. वैद्य रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पोहोचणार आहे.
Ans: टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेलजवळ होणारा रिंगण सोहळा ही प्रमुख आकर्षणे असतील.






