हाय युरिक अॅसिडची समस्या असेल तर काही डाळींचे सेवन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोणत्या आहेत या डाळी जाणून घ्या
मसूरमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. पण ते युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी फायदेशीर नाही, त्यामुळे युरिक अॅसिड वाढू शकते
चण्याच्या डाळीमध्ये प्रथिने आणि प्युरिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे युरिक अॅसिड तयार होते. त्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांनी चण्याची डाळ खाणे टाळावे
जास्त युरिक अॅसिड असलेल्या रुग्णाने राजमा खाऊ नये. राजमा तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढवू शकते
काळ्या उडीद डाळीमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे युरिक अॅसिड तयार होते. त्यामुळे सांधेदुखी आणि सूज वाढते त्यामुळे सहसा काळी उडीद डाळ खाणे टाळा
तूरडाळ खाल्ल्याने युरिक अॅसिड, संधिवात आणि सांधेदुखी वाढू शकते. या डाळींमुळे युरिक अॅसिडचे प्रमाण वाढण्याची समस्या वाढू शकते. हे सर्व टाळणे चांगले