आपण अनेक भाजी या सलाड स्वरूपात खात असतो. सलाड म्हणजे कच्च्या भाज्यांचे सेवन. पण कोणत्या भाज्या उकडून खाव्यात जाणून घ्या
पालक उकळवून खाणे उत्तम. यामुळे पानांमधील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन पालकातील ऑक्सॅलिक ॲसिड कमी होते. जे कॅल्शियम आणि लोह शोषण्यास मदत करते. तसंच आरोग्य सुधारते आणि ॲनिमियाचा धोकाही कमी होतो
ब्रोकोली खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते
जेव्हा रताळे उकडवतात तेव्हा त्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी टिकून राहते. उकडलेले रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते
फरसबी उकडून खाल्ल्यास ते पचायला सोपे जाते आणि असे केल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए टिकून राहण्यास मदत होते
उकडलेल्या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या आरोग्यास बळकटी देतात