सामान्यतः सगळ्यांना संत्रे अथवा लिंबू अशा फळांमधून विटामिन सी शरीराला अधिक प्रमाणात मिळते हे माहीत आहे. मात्र असे काही पदार्थ आहेत, ज्यात संत्र्यापेक्षाही अधिक प्रमाणात विटामिन सी आढळते. हे पदार्थ कोणते आहेत आणि कसा समावेश करावा जाणून घ्या
शिमला मिरची हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे, त्याच्या मदतीने अनेक पदार्थांची चव वाढवली जाते. जर तुम्ही एक मध्यम आकाराची लाल सिमला मिरची खाल्ली तर तुम्हाला 152 ग्रॅम व्हिटॅमिन सी मिळेल. तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येईल
पेरू हे एक अतिशय चविष्ट फळ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जर तुम्ही एक मध्यम आकाराचा पेरू खाल्ला तर तुम्हाला अंदाजे 125 ग्रॅम व्हिटॅमिन सी मिळेल. हे फळ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती तर सुधारेलच पण तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही व्यवस्थित राहते आणि पचनात कोणतीही अडचण येत नाही
किवी हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, जे फायबरने युक्त आहे, या फळाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. जर तुम्ही 2 किवी खाल्ले तर तुम्हाला 137 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळेल, जे तुमच्या शरीराच्या रोजच्या गरजेपेक्षा खूप जास्त आहे
पपई आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. या फळामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आढळतो ज्यामुळे अनेक रोगांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. एक कप चिरलेल्या पपईमध्ये 88 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. हे एक सामान्य फळ आहे जे नियमितपणे खाल्ले पाहिजे
अननस हे अतिशय रसाळ फळ असून त्यात पाचक एंजाइम असतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि जळजळ कमी करण्यात मदत करू शकते. अननस व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, तांबे आणि थायामिनने परिपूर्ण असतात. एका कप चिरलेल्या अननसात 79 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते, जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते