अभिमानास्पद! जगभरातील १०० बेस्ट फूड सिरीजमध्ये भारताच्या ६ शहरांचा समावेश; जाणून घ्या कुठे मिळते सर्वोत्तम जेवण
स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाणारे मुंबई या यादित पाचव्या क्रमांकावर आहे. वडा पाव, पाव भाजी, पाणी पुरी, भेळ, रगडा पॅटास हे येथील लोकप्रिय पदार्थ आहेत
पंजाबमधील अमृतसर शहर या यादित ४३ व्या क्रमांकावर आहे. अमृतसरी कुलचा, दाल मखनी, बटर चिकन, पालक पनीर, सरसो दा साग हे येथील लोकप्रिय पदार्थ आहेत
देशाची राजधानी दिल्लीचाही यात समावेश असून दिल्ली या यादित ४५ व्या क्रमांकावर आहे. दिल्लीत मोमोज, चाट, छोले भटुरे असे अनेक चिविष्ट पदार्थ चाखता येतात
कोलकाता या यादित ७१ व्या स्थानावर आहे आणि कोलकोतामध्ये पुचका, आलू चाॅप, रसगुल्ला, काठी रोल हे पदार्थ फार फेमस आहेत
नवाबांची शान हैदराबाद या यादित सामील असून हे शहर यात ५० व्या स्थानावर आहे. हैदराबादमध्ये बिर्याणी, पेसरा डोसा, चिकन ६५ आणि इडली फार लोकप्रिय आहे
चेन्नई या यादित ६५ व्या स्थानावर असून डोसा, इडला, मेदू वडा, चिकन ६५ , उत्तपा आणि सांबार इथे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते