अभिनेत्री दिव्या पुगावकरने शेअर केली तिची वटपौर्णिमा विशेष पोस्ट! (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिव्या पुगावकरने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
ही पोस्ट दिव्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी काही स्पेशल आहे. दिव्याचे हे क्षण तिच्या पहिल्या वटपौर्णिमा व्रताचे आहे.
दिव्या या फोटोंमध्ये फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. तिने या लुकमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
नाकात नथणी आणि कपाळी सौभाग्याचं लेणं लावून केलेला हा साज शृंगार पाहणाऱ्याला प्रेमात पडण्यासारखा आहे.
दिव्याच्या चेहऱ्यवरील हास्य या क्षणासाठी तिच्या मनात असणाऱ्या गोड भावनेची जाणीव करून देतो.