(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवी आईच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू प्रेक्षकांना या नवरात्रीत पाहायला मिळत असून आई तुळजाभवानी योगनिद्रेतून जागृत होण्याबरोबरच साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. भक्तांच्या रक्षणासाठी आसुरी संकटांचा अधिक तडफेने आणि ऊर्जेने सामना करण्यासाठी तुळजाई योगनिद्रेत गेल्यापासून देवीचे मानवी रूप असलेल्या छोट्या जगदंबेवर अनेक संकटं ओढवली, परंतु त्या इवल्याशा लेकराने आईच्या मार्गदर्शनाशिवाय तिच्या शिकवणुकीचा आधार घेऊन प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जात आपली शक्ती सिद्ध केली आणि आता ते क्षण आले आहेत जेव्हा तुळजाई योगनिद्रेतून जागृत झाली असून जगदंबा आणि तुळजाईची अलौकिक भेट घडत आहे. प्रत्येक भक्ताला देवी आईच्या भेटीचा आपला वाटणारा अनुभव देणारी ही भेट असेल.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या-आराध्याची एंट्री; भावूक चाहतीचे अश्रू पुसताना व्हिडीओ व्हायरल
हा अलौकिक क्षण जगत असताना प्रेक्षकांना आतुरता आहे, साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनाची. जगदंबाची आई गंगाईने साडेतीन शक्तिपीठांच्या देवींच्या दर्शनाचा घेतलेला ध्यास आणि आई तुळजाभवानी, सप्तशृंगी माता, रेणुका माता, आई अंबाबाई यांचे भूतालावर आगमन यामुळे हे दर्शन लवकरच घडणार याचे संकेत प्रेक्षकांना मिळाले आहेत. तेव्हा या अलौकिक अनुभूतीमुळे यंदाचे नवरात्र प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे. भक्तीची शक्ती, देवी आईचे मातृत्व आणि दैवी रूपाची दिव्यता यांचा अनोखा भव्य संगम प्रेक्षकांना रोज पाहायला मिळत आहे.
Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत भक्तीची शक्ती, देवी आईचे मातृत्व आणि दैवी रूप यांचा भव्य संगम प्रेक्षकांना दररोज पाहायला मिळत आहे, ज्यामुळे ही मालिका अधिक प्रभावी व भावनिक ठरली आहे.“आई तुळजाभवानी” ही मालिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानीच्या महागाथेवर आधारित आहे. भक्तांचे रक्षण, दुष्ट शक्तींचा निराकरण, देवीचा अवतार इत्यादी गोष्टी यात दाखवल्या जातात. या मालिकेत पूजा काळे ही आई तुळजाभवानी या देवीच्या भूमिकेत आहेत.