Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने, अभिज्ञा भावेने तिच्या जीवनमूल्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, "मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते''

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2025 | 12:48 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘तारिणी’ मालिकेमधील कौशिकी हे पात्र जितकं नीतीमूल्यांवर चालणारं आहे, तितकीच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील वास्तव जीवनात खरीखुरी, प्रामाणिक, मातृत्व भावना आणि संवेदनशील स्वभावाची आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने, अभिज्ञाने तिच्या जीवनमूल्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते – आईपण, करुणा आणि निस्वार्थीपणा ही तिची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत आणि ती माझ्यातदेखील मी अनुभवते. हे गुण माझ्यात आधीपासूनच होते, पण जेव्हा मी गरजू लोकांशी संवाद साधू लागले, तेव्हा मला जाणवलं की त्यांना मदत करताना, कुठलाही स्वार्थ न ठेवता मी त्यांच्या पाठीशी उभी राहते. हीच खरी निस्वार्थी सेवा आहे. मानवांप्रमाणेच प्राण्यांविषयीही तितकीच संवेदनशील आहे.

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

पुढे अभिज्ञा भावे म्हणाली,”मी कधीही मांसाहार केला नाही आणि माझ्यातली आईपणाची भावना प्राण्यांप्रती देखील आहे, बालपणात मी म्हण ऐकली होती ‘अज्ञानात सुख असतं’, पण जस मला कळू लागलं तेव्हा समजल कि मी कधी ही, कोणाचं दु:ख पाहून दुर्लक्ष करूच शकत नाही. मी नेहमी जागृत आणि सजग राहून जगते. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात, जेव्हा अनेक जण सोयीचा मार्ग निवडतात, तिथे मी कधीही सोपं वाटणारं, पण चुकीचं पाऊल उचलणार नाही. जरी योग्य मार्ग कठीण असला, तरी मी तोच मार्ग निवडते.

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

मी माझ्या जीवनशैलीत देखील अनेक बदल केले आहेत जसं की, गाडीमध्ये प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्या ठेवणं, शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळणं, अधिकाधिक झाडं लावणं, आणि पर्यावरणाचं भान ठेवणं. माझ्या अंत्यक्षणी मला स्वतःकडे पाहून अभिमानाने म्हणता येईल की, मी योग्य निर्णय घेतले, जरी ते कठीण होते, तरी मी माझ्या मूल्यांशी कधीच प्रतारणा केली नाही. अभिज्ञा भावेने ‘कौशिकी’ या पात्रात साकारलेली नीतिमत्ता आणि प्रत्यक्ष आयुष्यात दाखवलेली जबाबदारी यामुळे ती खऱ्या अर्थाने आजच्या काळातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरते.”

झी मराठी वाहिनीवरील नवी मालिका ‘तारिणी’ सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारी, दृढ आणि ध्येयवेडी मुलगी तारिणी हिची ही कहाणी, केवळ एक टीव्ही मालिका न राहता, अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

Web Title: Abhigyanna bhave revealed the secret of her selfless service saying i associate myself with the qualities of skandamata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
1

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो
2

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो

Shreya Bugde Photos : ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेचं डेनिम शर्ट-जीन्समध्ये ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
3

Shreya Bugde Photos : ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेचं डेनिम शर्ट-जीन्समध्ये ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?
4

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.