प्राजक्ता माळीची स्टाईल ही नेहमीच हटके असते आणि हे ती सतत सिद्ध करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो अपडेट केले असून चाहत्यांनी तुफान कमेंट्स दिल्या आहेत
हाफ शिमरी ब्लू आणि प्रिंटेड डार्क ब्लू असा तिने क्रॉप टॉप आणि खाली फिटेड स्कर्ट घातला असून त्यासह शिमरी दुपट्टा कॅरी केलाय. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे सुंदरी दिसतेय
या क्लासी ड्रेससह प्राजक्ताने अप्रतिम हेअरस्टाईल केली असून मधून भांग पाडत पोनी बांधला आहे. तर या पोनीला वेव्ही लुक दिलाय जो तिच्या या ड्रेससह परफेक्ट मॅच होताना दिसतोय
या शिमरी ब्लू ब्लाऊजसह प्राजक्ताने सिल्व्हर रंगाचे कानातले परिधान केले असून मिनिमल ज्वेलरी लुक कॅरी केलाय. कोणत्याही पार्टीसाठी तुम्ही प्राजक्ताकडून फॅशनची प्रेरणा घेऊ शकता
प्राजक्ताने यासह वेलवेटचा डार्क ब्लू प्रिंटेड स्कर्ट परिधान केला असून तिचा हा लुक एखाद्या राजकुमारीच्या पोषाखासारखा दिसतोय. त्यावर प्राजक्ताच्या कमालीच्या अदा चारचाँद लावत आहेत
यासह प्राजक्ताने मॅट मेकअप केला असून थोडा गडद मेकअप केलाय. तिने डार्क ब्लू रंगाला साजेशी पर्पल आयशॅडो, मॅट लिपस्टिक, काजळ, आयलायनर, डार्क आयब्रोज करून लुक पूर्ण केलाय