रिंकू राजगुरू आणि तिचं साडी प्रेम हे काही संपताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकसह तिचे नाव जोडले जात आहे. रिंकूचा हा लुक कसा दिसतोय पहा
व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने रिंकूने काही फोटो शेअर केले आहेत. तिने गुलाबी रंगाची प्रिंटेड साडी नेसली असून तिचा हा लुक अप्रतिम आणि आकर्षक दिसतोय
रिंकूने केस मोकळे सोडले असून हातात लाल गुलाब घेतले आहे आणि एका फोटोत तिने केस बांधले आहेत. तर हातात लाल बांगड्या घालून लुक पूर्ण केलाय
या साडीसह रिंकूने लाल ब्लाऊज मॅच केलाय आणि अत्यंत साध्या लुकमध्येही तिचे सौंदर्य खूपच उठावदार आणि मनमोहक दिसून येत आहे. रिंकूच्या चेहऱ्यावरून चाहत्यांची नजरच हटत नाहीये
चाहत्यांनी रिंकूच्या या फोटोंखाली तुफान कमेंट्स दिल्या असून काहींनी तिला यामध्ये कोल्हापूरची भावी सूनबाईदेखील ठरवलं आहे. रिंकूच्या अदा मात्र नक्कीच चाहत्यांना घायाळ करत आहेत
रिंकूने डार्क काजळ, लाईट शेड आयलायनर, हायलायटर, आयब्रो, कपाळावर टिकली आणि अगदी माईल्ड लिपस्टिक लावत मेकअप लुक पूर्ण केलाय. तिच्या नैसर्गिक सौंदर्यावरच तिने भर दिला असून हेच चाहत्यांना अधिक भावले असल्याचे दिसून येतेय