सईने ब्लॅक ऑफशोल्डर जंपसूट घातला असून त्यावर प्रिंटेड फुलं केवळ वरच्या बाजूला कोरण्यात आली आहेत आणि तिचा हा लुक रॉयल आणि क्लासी दिसून येत आहे
सईने यासह खांद्यावर लाँग जॅकेट घेतले आहे जे संपूर्ण प्रिंटेड असून यावर हिरव्या, निळ्या आणि गोल्डन रंगाच्या प्रिंटची फुलं आहेत आणि तिचा हा लुक या जॅकेटमुळे अधिक क्लासी दिसून येतोय
गालावर दोन्ही बाजूने केसांच्या बटा हुळहुळत असून तिने केसांचा मेस्सी आंबाडा बांधला आहे आणि ब्राऊनिश केस या लुकसह अत्यंत सुंदर दिसत आहेत
सईने यासह गोल्डन जाडसर ब्रेसलेट, गोल्डन कानातले आणि त्यासह तिने चापाचे लहान कानातले वर घातले असून बोटात गोल्डन अंगठी घालत यावर Accessories कॅरी केल्या आहेत आणि परफेक्ट स्टाईल केलीये
केसांचा लहानसा अंबाडा घालत तिने अगदी स्टायलिशरित्या केसांना गोल्डन हुक असणारा रबर लावत तिचा लुक पूर्ण केलाय आणि साध्या हेअरस्टाईलमध्येही अधिक सुंदर दिसता येते हे क्लिअर केलेय
सईने मॅट मेकअपचा आधार घेत, डार्क काजळ, स्मोकी आईज लुक, डार्क भुवया, गालाला हायलायटर लावले आहे आणि यासह तिने पिंक न्यूड शेड लिपस्टिकचा ओठांवर वापर करत आपला लुक पूर्ण केलाय