आळंदी: वारीची सुरुवात ही आळंदीपासून होते. त्यामुळे आत्म्याच्या आनंदाने वारीची सुरुवात होते असं म्हणतात.
पुणे वारीला निघाल्याने पापांचा नाश होऊन पुण्य मिळते म्हणून पुणे.
दिवेघाट: अष्टांगयोगाच्या म्हणजेच यम ते समाधी आचरणातून जाण्याचा मार्ग म्हणजे दिवेघाट.
सासवड: सप्तचक्रांची (मूलाधार ते शून्यचक्र) प्राणायामने होणारी जागृर्ती आणि सोपानदेवांचे दर्शन म्हणजे सासवड.
जेजुरी : 'ज' म्हणजे 'जितेंद्र', 'जुरी' म्हणजे 'जास्त त्रास न घेणे', जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतों तो आनंदी होतो. म्हणून वारीचा पुढचा मुक्काम हा जेजुरी आहे.
वाल्हे: भर तारुण्यात प्रेमळ आणि जिव्हाळासंपन्न होणे, (वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन) म्हणजे वाल्हे गाव.
लोणंद: श्रीविठ्ठल भक्तीने परमानंद मिळवून तो इतरांना देणे, आनंद वाटण्यात खरं सुख आहे म्हणून मुक्कामाचे हे ठिकाण म्हणजे लोणंद.
तरडगाव: ब्रह्मानंदाचा अनुभव न घेतल्यास जीवनात रहावे लागेल, या सिद्धांताचे चिंतन.
फलटण: ब्रह्म सत्य, जग मिध्या हा अनुभव वारकऱ्याला येतो, जीवनाचे सत्य समजते ते ठिकाण फलटण.
बरड : संसारातील द्वंद्वापासून मुक्ती आणि बासनाहीन जीवन (बरडच्या जमिनीसारखे) ते ठिकाण बरड.
नातेपुते : इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन केवळ श्रीविठ्ठलाचे होणे ते गाव म्हणजे नातेपुते.
माळशिरस: नामस्मरण, ध्यान आणि कीर्तन-प्रवचनाने ज्ञानाची साखळी पूर्ण होऊन विठ्ठलरूप होणं ते माळशिरस.
वेळापूर: एक क्षणही वाया विठ्ठलभजन करण्याचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजे वेळापूर गाव.
वाखरी: वाणी प्रासादिक आणि वाचासिद्ध होणे,म्हणजे वाखरी.
पंढरपूर: शेवटी पंढरपूरला जाऊन पूर्णपणे विठ्ठलाचरणी समर्पित होणं ते ठिकाण म्हणजे पंढरपूर.