सर्दी आणि खोकल्यावर घरगुती उपाय करता येतात. हे उपाय पचन सुधारण्यास मदत करतात, वजन नियंत्रित करतात आणि सर्दी-खोकला दूर ठेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. तसंच पोट फुगणे/गॅस/पोटदुखी कमी करण्यासाठीही उपयुक्त आहेत
हा उपाय करण्यासाठी 1 लिटर पाणी घ्या, त्यात अर्धा चमचे सुंठ अथवा आल्याचे तुकडे घाला आणि ते 750 मिली पाणी हे साधारण 250 मिली उकळेपर्यंत गॅसवर ठेवा. नंतर थंड वातावरणात दिवसभर हे पाणी तुम्ही पित रहा
आयुर्वेदात कोरडं आलं हे सुंठ म्हणून ओळखलं जातं. ताज्या आल्यापेक्षा सुंठ हे पचायला अधिक हलके आहे. याशिवाय सुंठ्याने घशातील कफामुळे होणारा त्रास कमी होतो
कफ कमी करण्यासाठी सुंठाचे पाणी हे उत्कृष्ट पेय आहे आणि हे कफनाशक आहे. सुंठाचा उपयोग सर्व ऋतूंमध्ये मसाला किंवा औषध म्हणून केला जाऊ शकतो. सुंठाचे पोषक तत्व कफासाठी उत्तम ठरते
हे पाणी उष्ण प्रकृतीचे आहे, म्हणून ज्या लोकांना जास्त पित्ताचा वा रक्तस्राव, उष्णता असे विकार आहेत, त्यांनी 1 बारीक वेलची त्यामध्ये मिक्स करावी. वेलची आवडत नसेल तर त्याऐवजी 5 तुळशीची पानेदेखील वापरू शकता
बऱ्याच वेळा खोकला झाल्यावरदेखील सुंठ पावडर खाल्ली जाते. चवीला तिखट असलेली सुंठ पावडर खाण्यासाठी अनेक जण नाक मुरडतात. मात्र, ही पावडर शरीरासाठी उत्तम ठरते. कफ लवकर कमी होतो