गौरी गणपतीच्या सणाला साडीवर शिवा 'या' खास डिझाईनचे सुंदर ब्लाऊज
हल्ली हॅन्ड पेंटिंगब्लाऊजची मोठी क्रेझ वाढली आहे. ब्लाऊजवर हातांनी गणपती, गौरी किंवा इतर अनेक वेगवेगळी चित्र काढली जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजवर पेंटिंग करू शकता.
कमीत कमी बजेटमध्ये या डिझाईनचा आरी वर्क ब्लाऊज तुम्ही तयार करून घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक रॉयल आणि सुंदर दिसेल. ब्लाऊजच्या हातांवर किंवा मागील गळ्याला या पद्धतीची डिझाईन नक्की ट्राय करा.
काहींना खूप जास्त साधे आणि अतिशय कमी वर्क केलेले ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुमच्यासाठी ही डिझाईन अतिशय उत्तम आहे. या डिझाईनचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदर दिसतील.
मोती वर्क केलेले ब्लाऊज कोणत्याही काठपदर, पैठणी किंवा डिझाइनर साडीवर अतिशय उठावदार आणि सुंदर दिसतात. मोती वर्क ब्लाऊज परिधान केल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही दागिने परिधान करण्याची आवश्यकता भासणार नाही.
पैठणी किंवा काठपदर साडी खरेदी केल्यानंतर तुम्ही हेवी डिझाईनचे आरी वर्क करून या पद्धतीने ब्लाऊज तयार करून घेऊ शकता. आरी वर्क केलेल्या ब्लाऊजमध्ये फुल हॅन्ड ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतात.