डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग 'हे' उपाय करून मिळवा आराम
बदलेली जीवनशैली, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप आणि सतत मोबाईल फोन पाहत राहिल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवरसुद्धा लगेच दिसून येतो. डोळ्यांखाली त्वचा काळी झाल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम लावतात तर कधी वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. डोळ्यांखाली वाढलेला काळेपणा लवकर निघत नाही. डोळे काळे झाल्यानंतर त्वचा अतिशय थकल्यासारखी आणि निस्तेज दिसू लागते. चेहऱ्याचे सौंदर्य आणखीनंचय उठावदार आणि सुंदर करण्यासाठी केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होतील.(फोटो सौजन्य – istock)
मुरुमं घालविण्यासाठी Tamannaah Bhatia वापरते स्वतःची थुंकी, तज्ज्ञांनी सांगितले तथ्य
जेवणातील अनेक पदार्थ बनवण्यासाठी बटाटा वापरला जातो. बटाटा टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाटा वापरावा. यासाठी बटाट्याची साल काढून बटाटा किसून घ्या. त्यानंतर बटाट्याचा रस काढून घ्या. कापसाच्या साहाय्याने बटाट्याचा रस संपूर्ण डोळ्यांभोवती लावून घ्या. यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होईल. बटाट्याचा रस १० मिनिटांपर्यंत त्वचेवर लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय केल्यामुळे डोळ्यांखाली त्वचा उजळदार होईल आणि त्वचा सुंदर दिसेल.
मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण शरीराची काळजी घेताना खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जात आहे. खोबऱ्याच्या तेलात असलेले गुणधर्म त्वचा आणि केस मजबूत करण्यास मदत होते. वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण डोळ्यांभोवती लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा अतिशय स्वच्छ आणि उजळदार होण्यास मदत होईल. १० मिनिट झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी होईल.
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बदाम तेलाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यास मदत करतात. यासाठी बदाम तेल हातांवर घेऊन डोळ्यांभोवती लावा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर काहीवेळ ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे डोळ्यांखाली वाढलेला काळेपणा कमी होईल.