Tech Tips: तुमच्या या चुकांमुळे बॅन होऊ शकतं WhatsApp अकाउंट! वेळीच सावध व्हा
जर तुम्ही एखाद्या युजरला त्याच्या परवानगीशिवाय WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी केले आणि त्याने ग्रुप लेफ्ट केला. त्यानंतर देखील तुम्ही त्या युजरला वारंवार ग्रुपमध्ये सहभागी करून घेत असाल तर तुमच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते.
जर एखाद्या व्यक्तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला कर कारवाई केली जाऊ शकते.
बॉट अॅक्टिविटी, बल्क मेसेज किंवा थर्ड पार्टी अॅपद्वारे ऑटोमेटेड रिप्लाय केल्यावर देखील कारवाईची शक्यता आहे.
थर्ड पार्टी आणि वैध WhatsApp वर्जन म्हणजेच 'GB WhatsApp' किंवा 'WhatsApp प्लस' चा वापर केल्याने अकाऊंट बॅन होऊ शकतं.
चुकीची माहिती, अफवा किंवा बेकायदेशीर मजकूर शेअर करणे किंवा धमकी देणारे संदेश पाठवणे यासाठी देखील कारवाई केली जाऊ शकते.