Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
एप्पलने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला एक मोठा एक इव्हेंट आयोजित केला होता. कंपनीने या इव्हेंटमध्ये त्यांची नवीकोरी आयफोन 17 सिरीज लाँच केली. या सीरिजमध्ये आयफोन 17 बेस मॉडेल, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि एका नवीन मॉडेलचा समावेश करण्यात आला होता. हे मॉडेल म्हणजे आयफोन 17 एअर. कंपनीने पहिल्यांदाच त्यांच्या आयफोन 17 सिरीजमध्ये आयफोन एअर या नव्या मॉडेलचा समावेश केला होता. कंपनीने जेव्हा ही नवीन सिरीज लाँच केली तेव्हा युजर्स प्रचंड उत्साही होते आणि ही सिरीज खरेदी करण्यासाठी एप्पल स्टोअर्सबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.
जेव्हा या सिरीजची फ्री बुकिंग सुरू करण्यात आली तेव्हा सर्व रेकॉर्ड तुटले. खरं तर आयफोन 17 सिरीजमधील काही मॉडेल्सची मागणी इतकी वाढली की कंपनीला पुन्हा एकदा प्रोडक्शन वाढवावे लागले. काही मॉडेल्सची इतकी क्रेझ होती की हे मॉडेल्स प्री बुकिंग दरम्यानच आऊट ऑफ स्टॉक झाले. या सिरीजमधील बेस मॉडेल, प्रो मॉडेल आणि प्रो मॅक्स मॉडेल या तिन्ही डिव्हाइसना उत्तम प्रतिसाद लाभला. मात्र आयफोनसोबत असं घडलं नाही. या मॉडेलला लोकांचा तितका प्रतिसाद लाभला नाही आणि त्यामुळे हे मॉडेल फ्लॉप झाले. कंपनीला या मॉडेलकडून जेवढी अपेक्षा होती त्या पूर्ण झाल्या नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
मॉर्गन स्टेनलीचे ऍनालिस्टने सांगितलं आहे की, आयफोन 17 सिरीजमधील एक मॉडेलला सोडता बाकी सर्व मॉडेल्सने ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मॉडेल्सची विक्री अपेक्षेपेक्षा जास्त वाढली. हा संपूर्ण डेटा एप्पल सप्लाय चैन आणि ऑनलाईन स्टोअर्स वरील शिपिंग एस्टिमेटच्या आधारावर देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहिले तर आयफोन 17 एअर बाबतीत असं घडलं नाही. आयफोन एअरची मागणी अपेक्षेपेक्षा फारच कमी होती आणि त्यामुळेच आयफोन चीनमध्ये देखील लॉन्च करण्यात आला नाही.
आयफोन एअरला प्रतिसाद का मिळाला नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही युजर्सने सांगितलं आहे की आयफोन एअरमधील बॅटरी फारच छोटी आहे आणि त्यामुळेच वारंवार चार्ज करण्याची गरज भासू शकते. याच कारणामुळे आयफोन कडे ग्राहकांनी पाठ फिरवली.
आयफोन एअर हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आहे. याची जाडी 5.6mm आहे. यामध्ये 6.5 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120z रिफ्रेश रेट आणि 3000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यामध्ये प्रो मॉडल वाला A19 Pro चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 3nm प्रोसेसवर आधारित आहे. याच्या रिअरमध्ये 48MP चा फ्यूजन कॅमेरा आणि फ्रंट फ्रंटला 18MP चा सेंटर स्टेज कॅमेरा देण्यात आला आहे. हे फक्त ई-सिमला सपोर्ट करते, म्हणूनच ते चीनमध्ये लाँच झालेले नाही. या फोनला अद्याप चीनमध्ये नियामक मान्यता मिळालेली नाही.