Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
गेल्या काही महिन्यांपासून सॅमसंगच्या पहिल्या ट्राय फोल्ड फोनबाबत प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, त्याची किंमत किती असणार आणि त्याचे फीचर्स काय असणार याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या फोनबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपडेटमध्ये फोनच्या लाँचिंग डेटबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा आगामी ट्राय फोल्ड फोन लवकरच लाँच केला जाणार आहे.
रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, सॅमसंगचा पहिला ट्राय फोल्ड फोन ग्योंगजू शहरात 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात आलेल्या एशिया-पॅसिफिक इकॉनोमिक कॉर्पोरेशन (APEC) सम्मिटमध्ये लाँच केला जाणार आहे. सॅमसंगचा पहिला ट्राय फोल्ड फोन Galaxy Z TriFold या नावाने लाँच केला जाऊ शकतो. याचे दोन हिंज असणार आहे, ज्यामुळे फोन तीन भागांमध्ये फोल्ड होणार आहे. सॅमसंग या फोनमध्ये आतील बाजूस फोल्डिंग स्क्रीन देऊ शकते. फोन बंद असताना, स्क्रीन आतल्या बाजूला राहील, ज्यामुळे पडल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Galaxy Z TriFold मध्ये 10 इंचाची Dynamic AMOLED 2X स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. हा आगामी स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे, ज्याला 16GB रॅम आणि 256GB-1TB स्टोरेजसह जोडलं जाणार आहे. हे अँड्रॉयड 16 वर बेस्ड One UI 8.0 वर आधारित असणार आहे. पूर्णपणे उघडल्यावर, फोन एका मोठ्या टॅबलेटसारखा दिसतो आणि फोल्ड केल्यावर त्याची स्क्रीन स्मार्टफोनसारखी दिसते. एकदा उघडल्यानंतर, तो गॅलेक्सी झेड फोल्ड 7 सारखा दिसतो.
सॅमसंग या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड लेंस आणि 50MP टेलीफोटो कॅमेरावाला सेटअप देऊ शकते. व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये 10-10MP चे दोन कॅमेरे दिले जाण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप बॅटरीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. फोनचे वजन सुमारे 300 ग्रॅम असण्याची अपेक्षा आहे.
चीनी कंपनी Huawei ने यापूर्वीच त्यांचे दोन ट्राय फोल्ड फोन लाँच केले आहेत. Huawei Mate XT हा जगातील पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन आहे. यानंतर कंपनीने अलीकडेच त्यांचा दुसरा ट्राय फोल्ड फोन लाँच केला होता. हा फोन सध्या फक्त चीनमध्ये विकला जात आहे. काही काळापूर्वी, कंपनीने वृत्त दिले होते की तो अमेरिकेत देखील लाँच केला जाऊ शकतो. Huawei च्या या ट्राय फोल्ड फोननंतर सर्वत्र सॅमसंगच्या ट्रिपल फोल्ड फोनची चर्चा सुरु झाली आहे.