Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साडी नेसल्यावर करा उठावदार हेअर स्टाईल, प्रत्येक जण पाहातच राहील

सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला साडी नेसतात. महिलांना साडी नेसायला खूप आवडते. सण समारंभाशिवाय इतर वेळी सुद्धा महिला साडी नेसून छान लुक करतात. साडी नेसल्यानंतर अनेकदा घाईगडबडीच्या वेळी नेमकी काय हेअर स्टाईल करावी, असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. साडी नेसल्यानंतर सुंदर पद्धतीने केस विंचरले तर साडीवरचा लुक अधिक सुंदर आणि उठावदार दिसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साडी नेसल्यानंतर कमीत कमी वेळात आणि केसांची शोभा आणखीन वाढवण्यासाठी कोणती हेअर स्टाईल करावी, याबद्दल सांगणार आहोत. सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा या हेअर स्टाईल नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-pinterets)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2024 | 02:11 PM

सणासुदीच्या दिवसांमध्ये करा 'या' आकर्षक हेअर स्टाईल

Follow Us
Follow Us:
1 / 5

लहान केस असलेल्या महिलांनी केस बांधण्यापेक्षा मोकळे ठेवले तर ते अधिक सुंदर दिसतील. मोकळ्या केसांचा भांग पडून दोन्ही बाजूने सुंदर लहान वेणी बांधून तुम्ही केसांच्या मागच्या बाजूला आडवा गजरा किंवा फुल लावू शकता. हे लुक खूप सुंदर दिसेल.

2 / 5

हल्ली बदलत्या ट्रेंडनुसार हेअर स्टाईलचे सुद्धा अनेक नवनवीन प्रकार आले आहेत. त्यातील सगळीकडे फेमस असलेली पोनीटेल हेअर स्टाईल तुम्ही सहज घरच्या घरी सुद्धा करू शकता. पोनीटेल बांधून तुम्ही त्यावर ब्रोच किंवा गजरा लावल्यास केसांची शोभा आणखीन वाढेल.

3 / 5

नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यानंतर महिला अंबाडा किंवा बन बांधतात. अंबाडा बांधण्यापेक्षा बन बांधून तुम्ही त्यावर गोलाकार गजरे आणि फुल माळू शकता.

4 / 5

साडी नेसल्यानंतर अनेक महिला वेणी घालण्यास प्राधान्य देतात. वेणी घातल्यानंतर केस मोठे आणि सुंदर दिसतात. पण तुम्ही केसांची शोभा आणखीन वाढवण्यासाठी या पद्धतीने केसांची वेणी घालून वेणीमध्ये गजरा, फुल किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावू शकता.

5 / 5

घाईगडबडीच्या वेळी कमीत कमी वेळात जर तुम्हाला सुंदर हेअर स्टाईल हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचे केस बांधू शकता. ही हेअर स्टाईल केसांवर खूप सुंदर दिसेल.

Web Title: Best hair styled which will look good on saree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 02:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.