Bhaubeej Gift Ideas: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
इंडक्शन शेगडी - गॅसला सुट्टी देणारा पर्यायसगळ्यात पहिला नंबर आहे इंडक्शनचा. चहा करायचा, दूध तापवायचं, अंडा उकडायचा किंवा भाजी परतायची असेल तर गॅस लावायची गरजच नाही. इंडक्शन खूप फास्ट गरम होतं. गॅसवर 10 मिनिट लागतात तिथे इंडक्शनवर 5 मिनिटात काम होतं. त्यामुळे सिलिंडर आपोआप कमी लागतो. शिवाय सुरक्षित पण आहे, मूल-बाळ असलेल्या घरासाठी एकदम बेस्ट.
इलेक्ट्रिक केटल - सकाळचा वेळ वाचवणारीसकाळी उठल्या उठल्या गरम पाणी हवं असतं. चहा, कॉफी, मुलांसाठी दूध गरम करणं यासाठी पूर्ण मोठी गॅस शेगडी लावावी लागते. केटल असेल तर फक्त बटन दाबलं की 2 मिनिटात पाणी उकळतं. ते आपोआप बंद पण होतं. हिवाळ्यात तर हे खूपच उपयोगी पडतं. छोटी गोष्ट आहे पण रोजचा थोडा थोडा गॅस यामुळे खूप वाचतो.
इलेक्ट्रिक राईस कुकर - एका बटणात सगळंभात, खिचडी, मोदक उकडणे, भाज्या वाफवणे यासाठी आपण गॅसवर कुकर लावतो आणि तो लक्ष ठेवत बसावा लागतो. इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये तुम्ही फक्त तांदूळ आणि पाणी टाकून बटन दाबायचं. भात झाला की तो आपोआप बंद होतो. जळण्याची, पाणी सांडण्याची भीती नाही. एका वेळी भात आणि भाजी दोन्ही शिजवता येते, त्यामुळे गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो.
एअर फ्रायर - तेलाशिवाय तळणदिवाळीचे पदार्थ, समोसे, कचोरी, फ्रेंच फ्राईज तळायला खूप गॅस आणि तेल लागतं. एअर फ्रायर मध्ये गरम हवेवर सगळं तळलं जातं. तेल 90% कमी लागतं आणि विज पण खूप कमी लागते. गॅसवर अर्धा तास लागणारं काम यात 15 मिनिटात होतं. तब्येतीसाठी पण चांगलं आणि गॅसची तर पूर्ण बचत.
इलेक्ट्रिक चॉपर - स्वयंपाकाचा वेग वाढवणाराअनेकदा काय होतं, भाजी चिरायला वेळ लागतो आणि तोपर्यंत गॅसवर कढई तापत राहते. किंवा फोडणी करून कांदा चिरेपर्यंत गॅस फुकट जातो. छोटा इलेक्ट्रिक चॉपर असेल तर कांदा, टोमॅटो, मिरची 10 सेकंदात बारीक चिरून होते. वाटण पण पटकन होतं. स्वयंपाक जलद झाला की गॅस आपोआप कमी लागतो. ही छोटी मशीन आहे पण रोजच्या घाईच्या वेळी खूप कामाला येते.
खरचं पैसे वाचतात का? सुरुवातीला ही 5 मशीन घ्यायला 5 ते 7 हजार खर्च येईल असं वाटेल. पण विचार करा, एक सिलिंडर जर दीड महिना चालला तर वर्षाचे 3 ते 4 सिलिंडर वाचतात. म्हणजे जवळपास 4000 ते 5000 रुपये वाचतात. 2 वर्षात या मशीनचे पैसे वसूल होतात आणि पुढे पूर्ण फायदा तुमचाच.त्यामुळे या भाऊबीजेला नुसती शोभेची वस्तू न देता, बहिणीच्या रोजच्या कामाला मदत होईल आणि तिच्या संसाराचा खर्च कमी करेल अशी भेट द्या. तिला पण खूप आनंद होईल आणि तुमचं गिफ्ट कपाटात पडून न राहता रोज वापरात राहील.