Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Income Tax Data 2025: १ कोटींपेक्षा जास्त पगार असणारे भारतीय किती? आयकर विभागाच्या आकडेवारीतून मोठा खुलासा!

Income Tax Data 2025: भारतातील १४० कोटी लोकसंख्येपैकी १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणारे किती लोक आहेत? आयकर विभागाच्या ताज्या आकडेवारीसह १० वर्षांतील डेटा जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 29, 2026 | 04:40 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • १ कोटींपेक्षा जास्त पगार असणारे भारतीय किती?
  • आयकर विभागाच्या आकडेवारीतून मोठा खुलासा
  • १० वर्षांत इतके वाढले कोट्यधीश करदाते
Income Tax Data 2025: भारतातील सर्वात श्रीमंतांची संख्या आणि कमाई दोन्ही वेगाने वाढत आहेत. पण, भारताच्या सुमारे १४० कोटी लोकसंख्येपैकी सात आकडी पगार किती लोकांना मिळत असेल? हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तविक आयकार विभागाचे अधिकृत आकडे यामागे सत्य समोर आणतात. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२५ पर्यंत एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची संख्या केवळ ३.२४ लाख नोंदवली गेली आहे. गेल्या दहा वर्षांत एक कोटीपेक्षा जास्त कमवणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे.

असे समजून घ्या १ कोटी उत्पन्न असणाऱ्यांचे गणित

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत देशात एकूण ९.१९ कोटी आयटीआर (ITR) फाइल केले गेले आहेत. १४.१ कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांपैकी हे रिटर्न जमा केले गेले आहेत. ३.२४ लाख वैयक्तिक करदात्यांपैकी २.९७ लाख लोक असे आहेत, ज्यांचे उत्पन्न १ ते ५ कोटींच्या दरम्यान आहे. या ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या करदात्यांपैकी ५३ टक्के लोक हे वेतनदार आहेत. यामध्ये १६,७९७ वैयक्तिक करदाते ५ ते १० कोटींच्या ब्रॅकेटमध्ये येतात. त्यानंतर १०,१८४ वैयक्तिक करदाते १० कोटींपेक्षा जास्त उत्पन्नाच्या ब्रॅकेटमध्ये येतात. वैयक्तिक करदात्यांसोबतच कंपन्या, फर्म, ट्रस्ट, एचयूएफ (HUF) आणि सरकारी संस्था यांनाही एकत्र केल्यास, एक कोटीहून अधिक उत्पन्न घोषित करणाऱ्या एकूण रिटर्न्सची संख्या ४.६८ लाखांपर्यंत पोहोचते.

१० वर्षांत इतके वाढले कोट्यधीश करदाते

इन्कम टॅक्स विभाग आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालातील डेटावरून असे दिसून येते की, गेल्या एका दशकात (म्हणजेच २०१३-१४ ते २०२५) करदात्यांच्या डेटामध्ये मोठा बदल झाला आहे. असेसमेंट इयर २०१३-१४ मध्ये केवळ ४४,०७८ लोक असे होते, ज्यांचे करपात्र उत्पन्न (Taxable Income) १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. गेल्या १० वर्षांत ही संख्या जवळपास ५ पटीने वाढली आहे.

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

२०१३-१४ मध्ये रिटर्न फाइल करणारे वैयक्तिक करदाते ३.३ कोटी होते, जे वाढून २०२३-२४ मध्ये ७.५४ कोटींवर पोहोचले. दरम्यान, अन्य एका अहवालानुसार ५० लाखांपासून १ कोटी उत्पन्नाच्या ब्रॅकेटमध्ये या १० वर्षांच्या काळात ४४० टक्क्यांची घसघशीत वाढ पाहायला मिळाली. हा आकडा २०१३-१४ मधील १.९ लाखांवरून वाढून ५.८२ लाख झाला. याशिवाय, २० लाख ते ५० लाख उत्पन्नाच्या ब्रॅकेटमध्ये ५२६.५% ची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

सुपर रिच आणि सॅलरीड क्लासचा डेटा

असेसमेंट इयर २०२३-२४ मध्ये २३ असे वैयक्तिक करदाते होते, ज्यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटींहून अधिक घोषित केले. तसेच, १०० ते ५०० कोटी उत्पन्नाच्या ब्रॅकेटमधील २६३ करदात्यांपैकी केवळ १९ लोक वेतनदार होते. याशिवाय, १० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या वेतनदार करदात्यांच्या संख्येत ४.७ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयकर विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे वैयक्तिक करदाते किती आहेत?

    Ans: ३१ मार्च २०२५ पर्यंत देशात १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न घोषित करणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची संख्या ३.२४ लाख आहे.

  • Que: १ ते ५ कोटी रुपयांच्या उत्पन्न गटात किती करदाते येतात आणि त्यातील वेतनदार किती आहेत?

    Ans: या गटात २.९७ लाख वैयक्तिक करदाते असून, त्यापैकी ५३ टक्के लोक हे वेतनदार आहेत.

  • Que: गेल्या १० वर्षांत १ कोटींहून अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या संख्येत किती वाढ झाली आहे?

    Ans: २०१३-१४ मधील ४४,०७८ वरून ही संख्या जवळपास ५ पटीने वाढून ३.२४ लाखांवर पोहोचली आहे.

Web Title: How many indians earn more than 1 crore income tax data marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Employees Salary
  • income tax
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor: ‘रामायण’मधून संस्कारांची शिदोरी! रणबीर कपूरसह दिग्गजांचा ५०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद
1

Ranbir Kapoor: ‘रामायण’मधून संस्कारांची शिदोरी! रणबीर कपूरसह दिग्गजांचा ५०० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री
2

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!
3

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?
4

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.