(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संस्कृतीपासून ते उर्मिला कोठारेपर्यंत 'या' कलाकारांनी केले मतदान (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या मतदानासाठी निवडणूक आयोगाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांची नोंदणी झाली असून, निवडणूक रिंगणात एकूण १५ हजार ९३१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक मराठी कलाकार देखील घराबाहेर पडले आहेत. आणि चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मतदान करण्याचे आवाहन देत आहेत.
मराठी कलाकारांमध्ये संस्कृती बालगुडे, उर्मिला कोठारे, प्राजक्ता माळी या सगळ्यांना मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच हिंदी कलाकार देखील मतदान करताना दिसले आहेत.
१० वर्षांनी आलेली संधी चुकवू नका! असे म्हणत मराठीमध्ये चर्चेत असलेले दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
तसेच, मराठीसह अनेक बॉलीवूड कलाकार देखील मतदानासाठी बाहेर पडले आहेत, ज्यामध्ये अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि सुनील शेट्टी यांच्या नावाचा समावेश आहे.