नववधू लग्नात परिधान करतात 'या' पद्धतीच्या बांगड्या
महाराष्ट्रीयन नववधूच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असतात. या बांगड्याना हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे. लग्नानंतर प्रत्येक महाराष्ट्रीयन वधूला हातामध्ये भरपूर हिरव्या बांगड्या घातल्या जातात.
मल्याळी नववधू लग्नामध्ये सोन्याचे दागिने परिधान करतात. शिवाय लग्न समारंभात सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या जातात.यामुळे नवरीचे सौंदर्य आणखीन वाढते.
गुजराती नववधूच्या हातामध्ये हिरव्या, लाल आणि निळ्या अशा विविध रंगाच्या बांगड्या असतात. या बांगड्या हातामध्ये खूप सुंदर दिसतात.
राजस्थानमध्ये लाख बांगड्या नववधूच्या हातामध्ये घालण्यास दिल्या जातात. या बांगड्या तयार करताना वेगवेगळे रंग वापरले जातात.
शीख आणि पंजाबमध्ये नववधूच्या हातामध्ये पंजाबी चुडा घालण्याची पद्धत आहे. पंजाबी बांगड्यांमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या मिक्स करून चुडा तयार केला जातो.