शरीराची ताकद वाढवण्यासाठी नियमित करा 'या' ड्रायफ्रूटचे सेवन
अंजीरमध्ये प्रीबायोटिक, फायबर इत्यादी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. मूळव्याध आणि पचनसंबंधित सर्व समस्यांपासून अंजीर खाणे अतिशय प्रभावी आहे. यामुळे आरोग्याची सुधारणा होते.
वय वाढल्यानंतर किंवा इतर समस्यांमुळे त्वचेमधील कोलेजनची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे, पिंपल्स इत्यादी अनेक समस्या दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंजीर खावे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोलेजनची कमतरता भरून काढतात.
सकाळी उठल्यानंतर अंजीर खाल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कारण यामध्ये विटामिन बी १२ मुबलक प्रमाणात आढळून येते. शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी नियमित २ भिजवलेले अंजीर खावेत.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांचे दुखणे वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळी औषध घेतली जातात. मात्र या औषधांसोबतच ड्रायफ्रूटचे सेवन करावे. अंजीर खाल्यामुळे हाडांमधील वेदना कमी होतात.
जगभरात कर्करोगाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. कर्करोगाच्या हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून अंजीर खावे. यामुळे शरीरात असलेल्या गाठी कमी होऊन शरीरातील पेशींचे कार्य सुधारते.