थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळे उपलब्ध असतात. शिवाय हंगामी भाज्यांचे आणि फळांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे पेरू. चवीला आंबट गोड असलेला पेरू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. पेरू खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला नियमित पेरूच्या सरबताचे सेवन केल्यास त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
पेरू खाण्याचे फायदे

हिवाळ्यात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पेरूचे सेवन करावे. पेरू खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी थंडीच्या दिवसांमध्ये पेरूच्या रसाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते.

थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन जाते. कोरडी झालेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी नियमित पेरूच्या रसाचे सेवन करावे. यामुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, पिंपल्स, डाग निघून जाण्यास मदत होते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात पेरूच्या रसाचे सेवन करू शकता. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कॅमिओ होऊन तुम्ही स्लिम दिसाल.

पेरू या फळात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. पेरूचा रस प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.






