महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी भाविकांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज परिते गावासह पंचक्रोशीतील गावकरी आक्रमक झालेत.हजारो गावकऱ्यांनी एकत्र येत कोल्हापुरात दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढला.1 एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेच्या दरम्यान जोतिबा मंदिरातील पुजारी हटवून शासकीय पुजारी नेमावेत. शिवाय मारहण घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली.दरम्यान या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं…या मोर्चात परिते गावासह पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ, तरुण, जेष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या..यावेळी प्रशासनाकडून पुजाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुचं राहणार आहे.. परंतु 1 एप्रिल रोजी होणारी श्री जोतिबा चैत्र यात्रा शांततेत आणि उत्साहाने साजरी करण्यात यावी असं आवाहन आंदोलकांनी केलंय.