थायरॉईडपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील दाह कमी होतो. शरीरात वाढलेला थायरॉईड संतुलनात ठेवण्यासाठी आहारात नियमित आलं लिंबाच्या पाण्याचे सेवन करावे.
हळदीमध्ये असलेले करक्यूमिन थायरॉईडसाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून नियमित सेवन करावे.
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे शरीरात वाढलेली जळजळ नियंत्रणात राहते. एक ग्लास पाण्यात एक चमचा जवस बिया टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून उपाशी पोटी जवसाच्या पाण्याचे सेवन करा.
पालक, ब्रोकोली आणि केळ्यापासून बनवलेल्या स्मूदीचे नियमित सेवन करावे. पालक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळून येतात.
थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी धणेच्या पाणी प्यावे. या पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक थायरॉईड ग्रंथी सामान्य स्थितीमध्ये आणण्यास मदत करतात.