फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे करा सेवन
स्वयंपाक घरात हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. जेवणात हळद टाकल्यामुळे पदार्थाची चव आणि सुंगंध वाढतो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात हळद मिक्स करून सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म फुफ्फुसांमधील जळजळ कमी करतात.
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर आल्याच्या चहाचे सेवन करावे. आलं शरीरासाठी अत्यंत प्रभावी आहे. धुक्यांमुळे घशात वाढलेली जळजळ, फुफ्फुसांमधील वेदना कमी करण्यासाठी आल्याचा रस प्यावा.
तुळशीच्या पानांना धार्मिक महत्व आहे. नियमित एक तुळशीचे पान चावून खाल्ल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. यामध्ये असलेले अँटीमायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म घशात वाढलेली खवखव दूर करतात.
शरीरातील श्लेष्मा बाहेर काढून टाकण्यासाठी काळीमीरीचे सेवन करावे. एक चमचा मधात काळीमिरी पावडर मिक्स करून चाटण खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानंतर छातीत जळजळ वाढते. ही जळजळ कमी करण्यासाठी काळीमीरीचे सेवन करावे.
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन करावे. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले जेष्ठमध शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते.