रोजच्या आहारात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास हाडांमधील सर्व कॅल्शियम होईल नष्ट
जास्त मिठाचे सेवन केल्यास मूत्राद्वारे अतिरिक्त सोडियम बाहेर टाकतो. यासोबतच शरीरातील कॅल्शियम सुद्धा बाहेर पडून जाते. त्यामुळे जेवणातील पदार्थांमध्ये कमीत कमी प्रमाणात मीठ टाकावे.
कोल्ड्रिंक्स आणि इतर कार्बोनेटेड पेये फॉस्फोरिक आम्लाने समृद्ध असतात. यामुळे शरीरातील कॅल्शियमचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे रक्तात कॅल्शियम आणि फॉसफर्सचे प्रमाण संतुलित असणे आवश्यक आहे.
काहींना सतत चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जास्त कॅफीनच्या सेवनामुळे मूत्रपिंडांद्वारे कॅल्शियम बाहेर पडून जाते. याशिवाय आतड्यांमधील कॅल्शियमची पातळी कमी होते.
जास्त साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स शरीरातील कॅल्शियमच्या पातळीवर गंभीर परिणाम करतात. यामुळे हाडांमधील कॅल्शियम बाहेर पडून जाते आणि शरीरात थकवा, वेदना जाणवू लागतात.
ऑक्सलेट असलेल्या अन्नपदार्थांचे आहारात कमी कमीत प्रमाणात सेवन करावे. ऑक्सलेटयुक्त पदार्थ आतड्यांमधील कॅल्शियम शोषून घेत नाहीत, ज्यामुळे आरोग्य बिघडते.