'या' शाहाकारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढेल Vitamin B12
दैनंदिन आहारात दूध, चीज, दही आणि ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघेल. एका कप दुधात सुमारे १.२-१.४ मायक्रोग्रॅम विटामिन बी १२ असते.
फोर्टिफाइड तृणधान्यांमध्ये विटामिन बी१२ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आहारात तुम्ही तृण धान्यांचे सेवन करू शकता. गहू, बाजरी, नाचणी इत्यादी धान्यांपासून बनवलेले पदार्थ नेहमीच खावेत. याशिवाय आहारात तुम्ही ओट्स सुद्धा खाऊ शकता.
दह्यामध्ये केवळ प्रोबायोटिक्सच प्रमाण भरपूर नसून इतर आवश्यक गुणधर्म सुद्धा आढळून येतात. ग्रीक दह्यामध्ये रोजच्या दह्यापेक्षा इतर आवश्यक घटक आढळून येतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात नियमित एक वाटी दही खावे.
निर्सगाच्या सानिध्य्तउपलब्ध असलेले मशरूम शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. पण मशरूम खरेदी करताना ते खाण्यायोग्य आहेत की नाही याची खात्री करूनच विकत घ्यावे.
सोया मिल्क, सोयाबीन किंवा रोजच्या आहारात पालेभाज्यांचे नियमित सेवन केल्यास विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघेल. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीराला हानी पोहचते.