रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित करा तुळशीच्या चहाचे सेवन
तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. तुळशीच्या चहामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात.
सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्यामुळे सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. साथीच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि आरोग्य सुधारते. गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसारख्या पोटाच्या समस्यांपासून कायमचा आराम मिळतो.
तुळशीमध्ये युजेनॉल सारखे संयुगे असतात, ज्यामुळे शरीरातील दाह कमी होतो. उपाशी पोटी तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येतो आणि पिंपल्स कमी होतात.
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले मुरूम, फोड आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.