dadar kabutarkhana history in Marathi mumbai news update
दादरमधील कबुतरखाना हा मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर बंद करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना घायला घालण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर येथे ताडपत्री टाकून हा कबुतरखाना बंद करण्यात आला
दादरचा कबुतर खाना बंद करण्यात आल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला आहे. दादर कबुतरखाना हे जैन मंदिराकडून सुरु करण्यात आलेलं एक खाद्यस्थळ आहे.
कबुतरांना खायला देणं हे एक पवित्र धार्मिक कार्य असून, त्यामुळं पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी जैन धर्मात धारणा आहे. अनेक धर्मांमध्ये कबुतराला विविध देवातांशी जोडण्यात आले आहे.
दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चेमध्ये आला असून बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दादरच्या कबुतरखान्याला 92 वर्षांचा इतिहास असून, 1933 मध्ये दादरमध्ये कबुतरखाना सुरू करण्यात आला होता.
दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चेमध्ये आला असून बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दादरच्या कबुतरखान्याला 92 वर्षांचा इतिहास असून, 1933 मध्ये दादरमध्ये कबुतरखाना सुरू करण्यात आला होता.
मीडिया रिपोर्टनुसार,1944 मध्ये दादर जैन मंदिराकडून या भागात येणारी वाहनांचा पक्ष्यांना धोका असल्यानं कबुतरांसाठी एक संरक्षण कुंपण बांधण्याची परवानगी मागणारं पत्र पालिकेला लिहिलं होतं
मुंबईतील कबुतरखान्यावरुन यापूर्वी देखील वाद निर्माण झालेले आहेत. 3 जुलै 2025 रोजी विधान परिषद अधिवेशनादरम्यान उदय सामंत यांनी कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळं श्वसनरोगांचा धोका अधोरेखित करत मुंबईतील 51 कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली आहे.