अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या अभिनयाने राज्यभरात सर्वत्र गाजली होती. अभिनेत्री यानंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली होती. तिच्या सौंदर्याच्या जादूने राज्यभरात चाहत्यांची रांगच लागत होती. अभिनेत्री सोशल मीडियावर तशी फार सक्रिय असते. आता सोशल मीडियावर तिचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूची ही खास पोस्ट पहिली का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिच्या चाहत्यांना ही पोस्ट प्रचंड आवडली आहे.
दसऱ्याच्या विशेष मुहूर्तावर तिने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे.
लाल रंगाच्या या साडीमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. नाकात नथ आणि केसात अंबाडा, असा हा खास लुक वेड लावत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'दसरा आणि विजयादशमी च्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा' नमूद करत दसऱ्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
चाहत्यांनी तिच्या पोस्टखाली कौतुकाचा वर्षाव केला आहे. अगदी रांगच लावली आहे.